Saturday, April 29, 2017

जातिसंस्था उत्पन्न कैसे हुई? (किश्त १)समस्या जातिसंस्था की नहीं, हमारे जातिसंस्था के प्रति आकलन की हैं. यही वजह है कि इस व्यवस्था को खत्म करने के हमारे आज  तक के सारे प्रयास असफल रहे है.हमे जातियां उत्पन्न कैसे हुई यह जब तक पता नहीं चलता, जातिनिर्मुलन की बाते करना बेकार हैं!


Friday, April 28, 2017

हिंदुंना वर्णव्यवस्था लागू नाही!

शूद्र-अतिशूद्र म्हणजे जे वैदिक धर्माचे नाहीत त्यांना वैदिक लोक शूद्र म्हणत असत. त्यांचा धर्म वेगळा. मुस्लिम जसे काफिर शब्द अन्य धर्मियांना वापरतात तसाच हा शूद्र शब्द. आपल्या धर्माला प्राचीन काळी "आगमिक" असे नांव होते. सातवाहनही स्वत:ला "आगमान निलया" (आगमांनुसार चालणारे) म्हणवून घेतात. हे आगमिक म्हणजेच हिंदू होत. वैदिक धर्मीय स्वत:ला वैदिक अथवा सनातन धर्माचे लोक म्हणवत असत. वैदिकांनी ज्यांना शूद्र म्हटले त्या शूद्र राजांचीच परंपरा मोठी आहे. ज्ञात इतिहास शिशुनाग वंशापासून सुरु होतो. तो व नंद घराण्यापासून ते यादव घराणे शूद्रच राजघराणी होती. शिवाजी महाराजांनाही शुद्रच (म्हणजे परधर्मीय) मानले गेले होते. भारतात झालेले वैदिक राजे दोनच. शृंग आणि काण्व. वैदिक धर्म वेगळा आहे तर मुर्तीपुजकांचा आपला धर्म वेगळा आहे. वैदिकांनी परधर्माचे म्हणून हलके लेखण्यासाठी शूद्र/क्षुद्र असा भ्रम निर्माण केला. पण ते वास्तव नव्हते. मनुस्मृतीनुसार शुद्राला साधे चांगले कपडे घालायलाही परवानगी नाही, मग शूद्र राजे कसे झाले बरे? हा विचार हिंदुंनी केला नाही. दहाव्या शतकानंतर आर्थिक अवनतीच्या काळात अकारण न्युनगंड वाढवला गेला. संस्कृती व इतिहासच विसरल्याने आजही हा न्युनगंड हिंदुंत कायम आहे. त्यातून बाहेर पडणे हे हिंदुंसमोरील पहिले कार्य आहे.

आपण "वैदिक" हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्यात ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य हे तीन वर्ण येतात. क्षत्रीय नसूनही क्षत्रीय असल्याचे समजत तशी वर्ण अथवा जातीश्रेष्ठत्वता मिरवणारेही त्यात येतात. वैदिक म्हणजे फक्त ब्राह्मण नाही. हे तिन्ही मिळून वैदिक होतात. वैदिकत्व सोडणारेही अनेक आहेत, त्यांचा आपण सन्मानच करतो. त्यांचा धर्म सर्वार्थाने वेगळा कसा हे हे समजावणे व आत्मभान मिळवत स्वत:चा धर्म समजावून सांगणे हा आपला मुख्य उद्देश्य आहे. थोडक्यात वैदिकांनी ज्यांना शुद्र, अतिशुद्र व आदिवासी असे लेबल दिले हेच मुळचे हिंदू असून बाकी वैदिक आहेत. त्यांच्या हिंदुंमधील हस्तक्षेपामुळे हिंदुंचे अतोनात नुकसान झाले आहे. आता ते होऊ न देणे हे काम आपणा सर्वांना करावे लागेल.

हिंदू हे वैदिक धर्माचे नसल्याने उच्च्घनीचतेचे वैदिक नियम अथवा वर्णव्यवस्थाही त्यांना लागू पडत नाही. जाती म्हणजे व्यवसाय. सर्व जातींचा (म्हणजे व्यवसायांचा) समतेच्या पातळीवर सन्मान करणे हा हिंदू धर्माचा गाभा सर्व तंत्रशास्त्रांनी सांगितला आहे. या जन्मीची जात ही गेल्या जन्मातील पापाची परिणती हा वैदिक सिद्धांत बोगस आहे, मुळात वैदिक धर्मग्रंथांतही हा सिद्धांत नाही. उत्तर काळत, म्हणजे पार अकराव्या शतकात स्वार्थी वैदिकांनी तो निर्माण केला. पण त्याला प्राचीन वैदिक धर्मग्रंथांचा आधार नाही. या सिद्धांताला ठोकरून लावा. स्वत:च्या धर्माप्रमाणे वागायला शिका.

-Sanjay Sonawani

संस्कृत भाषा पुरातन?संस्कृत भाषा पुरातन आहे आणि ती वैदिकांनीच निर्माण केलेली भाषा आहे. बाकी भाषा संस्कृतातुनच निर्माण झाल्या हा भ्रम निर्माण करण्यात वैदिक कालौघात यशस्वी ठरले. खरे तर हिंदुंची मानसिकता तेथुनच न्युनगंडात जायला सुरुवात झाली. जोवर भाषेचे मूळ नेमके काय आहे हे समजत नाही तोवर या न्युनगंडाला पर्यायही नाही. आजकाल प्रमाणभाषेची जी थोतांडे गाजवली जातात ती केवळ नव्या वर्चस्ववादासाठी हेही समजावून घेण्याची गरज आहे. 

https://www.youtube.com/watch?v=nBXuZv4cLAY
Wednesday, April 26, 2017

ही नरकासुराची कथा!

महात्मा बळीची कथा जशी धुसर करत नेली गेली तशीच नरकासुराचीसुद्धा गत आहे. नरकासुराची कथा अवतरते महाभारतात व नंतर विस्तृत स्वरुपात हरीवंशात. आधी आपण नरकासुराच्या उपलब्ध काहे कथांचा आढावा घेऊ!


भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने १६००० स्त्रीया (अथवा राजकन्यांना) पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांनाही वरदान दिले. नरकसुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला असेल याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?

कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. कृष्णाने पाठोपाठ गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षोहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.

याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक पण थोडी वेगळी कथा येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.

नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या स्त्रीया (किंवा राजकन्या) कोणाच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारंण नरकासुराने (हे कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा मुद्दाम बनवण्यात आली हे उघड आहे.

ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. ते ऐतिहासिक मानता येत नाही.

कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी त्याने तसे वरदानच मागितले होते अशा स्पष्टीकरण कथा बनवल्या गेल्यात हे उघड आहे.

प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.

म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.

म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट नव्हता. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ . त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.

दुसरे असे कि व्रतराजामद्ध्ये नरकचतुर्दशी या काम्य व्रताची माहिती येते. हाही अत्यंत उत्तरकालीन व्रते सांगणारा ग्रंथ असला तरी यात नरक चतुर्दशीला नरकासुराच्या नांवाने दिवे लावत, व्रतकर्त्याच्या कुलात जेही कोणी अग्नीत दग्घ होऊन मेले असतील वा जे अदघ्धच राहिले असतील या सर्वांना परगती मिळो अशी प्रार्थना चूड पेटवून करावी असे म्हटले आहे. या व्रताची सांगता शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देवून करावी असेही म्हटले आहे. या व्रतात नरकासुराची कोणतीही कथा सामाविष्ट नाही.

नरकासूराचा संबंध "नरक" या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात "नरक" या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्कानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये "क" म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू "काश" धातुपासून अर्धांग का घेतले तर.)
नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक...म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले?

L Renou यांनी "वैदिक निऋतीतून निर्रया - निर्रका- नारक- नरक असा प्रवास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. ("Language of the Nirukta" तळटीप -मंत्रीनी प्रसाद) पण ही व्युत्पत्ती निरर्थक अशीच आहे. निऋतीवरून नैऋत्य दिशेचे नांव आले असे म्हटले जाते पण नरकासुराच्या राज्याची दिशा ती नाही. तर या शब्दाची व्युत्पत्ती अनिश्चित असल्याचे "Pali-English Dictionary" (Thomas William Rhys Davids, William Stede) एवतेव नरक हा शब्द मुळचा वैदिक दिसत नाही तसेच त्याचा अर्थही आज घेतला जातो तसाच मुळचा असण्याची शक्यता नाही.

थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, अशी व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो...नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. 

Tuesday, April 25, 2017

लग्नाआधी घटस्फोट? हिंदुंनो सावध!!


Image result for hindu marriage actपरवा मी एका लग्नाला गेलो होतो. पुरोहित जे मंत्र "वैदिक पद्धतीचा विवाह" म्हणून म्हणत होता ते ऐकून तर मी बेशुद्ध पडायचा बाकी राहिलो. सप्तपदीच्या वेळीस पुरोहित नव-या मुलाला मुलीला उद्देशून म्हणायला सांगतो..."इदं न मम" म्हणजे लग्नाआधीच "तू माझी नाहीस". म्हणजे चक्क घटस्फोटच की! नशीब तेथेच पत्नीला स्वाहा करायला लावले नाही. बाकी मंत्रांतील एकही मंत्र वैदिक नव्हता व मुख्य म्हणजे लग्नाशीही संबंधीत नव्हता. संस्कृतात असल्याने हिंदुंना काय म्हटले जाते हे समजत नाही. उलट लै खूष असतात लोक...कि काय भारी लग्न लावलं म्हणून! पण मुळात हा लग्नविधीच नाही हे कोणाला समजायचे? 

कोणी लग्नाला श्राद्धाचेही मंत्र म्हणत असतील. कसे समजणार? रजिस्टर लग्न करा ना त्यापेक्षा किंवा गांवक-यांनी मंगलाष्टके म्हटली तरी पुरेशी आहेत. शेवटी लग्न म्हणजे आहे तरी काय? श्रद्धायुक्त मनाने सहचरासोबत कोणत्याही स्थितीत जीवनभर एकत्र सुखाने राहण्याची केलेली समाजासमोरची प्रतिज्ञा म्हणजे लग्न. हे "देवाब्राह्मणांच्या साक्षीने" लग्न म्हणजे थोतांड आहे हे कधी समजणार?

हिंदुंना वेदांचा कसलाही अधिकार नसला तरी त्याचे खुळ आहे व आजकाल ते किमान विवाहात तरी वाढलेले आहे. ते का वाढवले जाते आहे हे समजायला फारशा बुद्धीची गरज नाही. "वैदिक पद्धतीने विवाह संपन्न होईल" असे चक्क अनेक लग्नपत्रिकांवर छापलेले असते. म्हणजे लग्न लावायची वैदिक पद्धती वेगळी आणि हिंदू पद्धती वेगळी हा फरक माहितच असतो. 

पण वैदिक पद्धतीने हिंदुने लग्न लावणे म्हणजे मुस्लिम पद्धतीने ख्रिस्त्याने लग्न लावणे. हा धर्म-समभाव ठीक वाटला तरी मुळात मंत्र तरी लग्नाचेच म्हणावेत की नाही? पुरोहितांना मी दोष देत नाही कारण त्या बिचा-यांना तरी कोठे काय माहित असते? त्याला एक मंत्राचा अर्थ विचारा...मग पहा कशी फे फे होते. कोठलेतरी कशासाठीही असलेले पण संस्कृतातले मंत्र असले कि पुरोहिताला पुरेसे असते! पण लग्न करणा-यांना अक्कल नको का?

लग्नाची वैदिक पद्धती खरोखर वेगळी असते. वैदिकांची लग्ने त्याच पद्धतीने होतात. हिंदुंसाठी कधीही वैदिक पद्धती वापरली जात नाही हे समजत नसेल तर आपल्या अज्ञानाबद्दल आपलेच डोके झोडून घ्या!

-संजय सोनवणी

Saturday, April 22, 2017

महात्मा बळी आणि वैदिकांच्या बोगस कथा!

बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक-खंडकाव्येही नाहीत. बळी नेमका कधी व कोठे झाला याचीही स्मृती हरपली आहे. ज्या आहेत त्या लोककथा, लोकगीते व महाभारत-पुराणांतुन येणा-या भ्रष्ट वैदिकीकरण झालेल्या कथा. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पातालात पाठवणा-या (अथवा गाडणा-या) वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. मात्र बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत. किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
असे असले तरी वैदिक कलमे झालेल्या कथांमुळे बळीचे चरित्र आपल्यासमोर विपर्यस्त स्वरूपात समोर येते. असे का झाले याचा अंदाज कोणीही बांधू शकतो. पण त्यात जाण्यावपेक्षा आपण बळीला पाताळात पाहणा-या वामनावताराचाच आधी धांडोळा घेऊयात!
वामन हा विष्णुचा अवतार मानला जातो. किंबहुना सारेच अवतार या ना त्या कारणासाठी विष्णुने घेतले असे सर्व पुराणे उच्च रवात सांगत असली तरी ते वास्तव नाही. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. पण अवतार घ्यायचे कार्य विष्णुकडे नव्हे तर प्रजापती या देवतेकडे होते. पहिल्या मत्स्य, कुर्म व वराह या तीन अवतारांचे स्पष्ट सूचन शतपथ ब्राह्मण (२.९.१.१) तैत्तिरिय आरण्यक व तैत्तिरिय ब्राह्मणात आहे. हे तिन्ही अवतार प्रजापतीचे. पण ते नंतर विष्णुच्या नांवावर खपवण्यात आले.
अवतार घेण्याचे कार्य पुढे उत्तरकालात (तिस-या-चवथ्या शतकानंतर, गुप्तकाळात) पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या आगमिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत. देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपुर्ब साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).
वामन अवताराची कल्पना एकाएकी विकसीत झालेली नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. किंबहुना या कथेचा विकास तीन टप्प्यांत झालेला आहे. ते कसे हे पाहुयात.
ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. या तीन पावलांत तो विश्व आक्रमतो ही मुलची वैदिक निसर्ग-रुपकाची संकल्पना. येथे बळीचा काहीही संबंध नाही.
ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे. तिचाही बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण एक पुराकथा सांगते. ते असे कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५).
या कथेत समस्त असूर आहेत. विष्णु आहे व त्याची तीन पावलेही आहेत. नाहीय तो बळीराजा!
पुढे हीच कथा अजून विकसीत करत मुळच्या कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुराणपंथी कथा बनवण्यात आली. येथे वामनाच्या रुपातील विष्णू न येता विष्णुचा वामनावतार आला. बळीच्या कथा महाभारत व अनेक पुराणांत वेगवेगळ्या स्वरुपात येतत. बळीचे महाबलाढ्य असूर असणे व वामनाची तीन पावले हा भाग वगळला तर कोणत्याही कथेत एकवाक्यता नाही. बळीने स्वर्ग जिंकून देवांना हरवले. ते घाबरून रुपे बदलून परागंदा झाले. पौराणिक कथा बळीने यज्ञ केला व त्या प्रसंगीच वामनाने तीन पावले जमीन दान मागितली असे सांगतात. यातही गफलत अशी कि असूर्त हे यज्ञविरोधक व यज्ञविध्वंसक होते, यज्ञकर्ते वैदिक नव्हे. पण एनकेनप्रकारेन यज्ञमाहात्म्य वाढवण्यासाठी ही क्लुप्ती केली गेली आहे हे उघड आहे.
सर्व कथा पाहिल्या तर हे स्पष्ट आहे कि वामन अवतार कथा जुन्याच (बळीशी संबंध नसलेल्या) कथांत बळीची भर घालवून बनवल्या आहेत. वामन अवतारात कसलेही तथ्य नाही त्यामुळे वामनाने बळीचा खून केला किंवा पाताळात पाठवले यातही तथ्य नाही. बळी महान राजा होता याबाबत एकाही पुराणकथेतही दूमत नाही. पण वाईट हे होते त्यांच्या दृष्टीने कि तो देवांचा (म्हणजे वैदिकांचा) शत्रू होता.
बळीची घटना भृगूकच्छमध्ये घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात.
शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचारही सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत, त्यांचे स्वत:चे पुरोहित आहेत.म्हणजेच बळी हा वैदिक भारतात प्रवेशण्यापुर्वीच होऊन गेला होता. दक्षिण दिशा त्याज्ज्य नंतर झाली असली तरी या काळात वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतेल अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. (Some Aspects of Ancient Indian Culture by D. R. Bhandarkary, पृष्ठ-३५)
इतिहासात बळी नांवाचा राजा तरी खरेच घडला होता काय हाही प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे. यच्चयावत देशात त्याच्याबद्दल आदरभाव असणे, त्याच्या नांवाचे राजकीय विभाग असने, त्याला अनेक राजवंशांनी पुर्वज मानने, त्याच्या वंशातील राजांचे उल्लेख मिळणे या बाबी तो खरेच होऊन गेला हे ठामपणे ठरवायला पुरेसे नसले तरी वामनावतारात जशी गफलत आहे तशी बळीच्या बाबतीत नाही. वैदिकांनाही बळीचे माहात्म्य खोडुन काढता आले नाही. त्यांना त्यांच्या विपर्यस्त कथांतही ते मान्य करावेच लागले. त्यामुळे वैदिक भारतात आले तेंव्हा बिहारमद्ध्ये बळीच्या वंशजांची सत्ता असावी व त्यांनी वैदिकांना विरोध केला.  
अर्थात महाबळी मुळचा कोठलाही असला तरी आज तो सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी व एतद्देशियांत नकळत न्यूनगंड निर्माण करण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कोणी पुजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहित आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणे योग्य नसून सत्यशोधन करणे गरजेचे बनून जाते ते यामुळेच. महात्मा बळी झाला त्या काळात भारतात वैदिक धर्मच अस्तित्वात नव्हता तर मग त्यांचा दुय्यम विष्णू भारतात अवतार घ्यायला येईलच कसा हा विचार आम्ही का केला नाही?
आज आपण आपलीच संस्कृती जपत असतांना "पुर्वजांचा पराभव झाला होता" या मिथककथांत रमत सांस्कृतिक व्यूहरचना करतो, समजतो, न्यूनगंड जोपासतो हे समूळ चुकीचे आहे. सांस्कृतिक वर्चस्वतावादाला थारा न देता स्वमुळांचा शोध महत्वाचा बनून जातो तो यामुळेच. देव -असूर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. आजही तो संघर्ष वेगळ्या रुपाने अस्तित्वात आहे. बळीराजासंदर्भातील कथा मुळात कशा पद्धतीने विकसीत केल्या गेल्या हे पाहिले कि देव संस्कृती व असूर संस्कृतीतील युद्धे फक्त रणात लढली गेली नाहीत तर साहित्यातुनही कशी लढली गेली याचे प्रत्य्यंतर येते, व युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच कसा जिंकतो हेही दिसून येते. पण प्रत्यक्ष कोण जिंकले हे आपण आज जी संस्कृती जपतो त्यावरुनही समजून येते. 

-Sanjay Sonawani

Thursday, April 20, 2017

वैदिकांनो, या प्रश्नांची उत्तरे द्या!
समजा वैदिक आर्य भारतातीलच होते व वैदिक धर्माची स्थापना झाली हे काहींचे म्हणणे मान्य केले तर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नांना सोयिस्कर बगल दिली जाते. कोणते आहेत हे प्रश्न? त्यावर चर्चा का केली जात नाही? कोणते आहेत हे प्रश्न? अवश्य पहा आणि तुम्हाच विचार करा!

Wednesday, April 19, 2017

वैदिक धर्म यहां फैला कैसे?

वैदिक धर्म स्थापन तर झाला. तो येथेच स्थापन झाला हे क्षणभर मान्य केले तर मग ज्या समस्या निर्माण होतात त्यावर वैदिक विद्वानांना उत्तरे देता येतात का? वैदिक विद्वानांच्या "भारतीय आर्य" सिद्धांताचा पायाच उखडून टाकणारे संजय सोनवणींचे भाषण.

Why Vedics want to make Sarasvati out of Ghaggar river?

वैदिकांनाच आपले मुलस्थान कोणते हे शोधायची एवढी निकड का भासली असावी बरे? घग्गर नदीला सरस्वती नदी ठरवण्यासाठी एवढे जीवाचे रान का केले जात आहे? ते ठरवण्यासाठी खरेच यांच्याकडे पुरावे आहेत काय? अवश्य पहा!

Vedicist Kalyanraman and the Sarasvati!


Kalyanraman is the dumbest writer I ever came across. He believes that the Sarasvati River was one among Sapta Sindhu, i.e. seven rivers those flowed through northwestern India. He states that this region belonged to the Panchajana, five people, and that about 80% of the Indus civilization are located on the banks of the Sarasvati river (which has be known to the Indians as Ghaggar since time unknown.) He has shifted complete geography of the River Sarasvati, highly revered by the Vedic Aryans, to stake a huge claim on the authorship of the Indus-Ghaggar civilization. To do this he recklessly neglects geological proofs, geography appearing in the Rig Veda and makes out a theory that is flimsy and misguiding.

Geologically it has been proven beyond doubt that the Ghaggar River never ever had the glacial source. It also has been proven with new geochemical and geomorphological studies that Yamuna and Sutlej stopped flowing into the Ghaggar thousands of years before the Harappan civilization. Ghaggar is fed from Shivaliks and not Himalayan glaciers. No Drushadvati river belongs to the Indian soil that is said to be a tributary to Vedic Sarasvati.

It is a fact that the River Ghaggar was a perennial river before 1800 BC because of the wetter monsoon. It also is a fact that there are over a thousand Indus-Ghaggar sites along the channel of old Ghaggar. But as the climate changed, gradually the Ghaggar shrunk and just became a seasonal river. Not only India, but from Mesopotamia to China, a vast track suffered from this climatic change. However, though seasonal, Ghaggar was never a lost river. How come that the most revered river of the Vedics changed name from Sarasvati to Ghaggar? Vedic has no answer to this vital question.

“Since this work, no new data challenging these results has appeared. Scientists, as evidenced by this paper, appear to now accept that the Ghaggar was a monsoonal river right through the Holocene. This result has annoyed not only geologists who had proposed the glacial river theory but also supporters of the indigenous Aryan theory. They had used the glacial river theory to time the presence of the Vedic people in the plains of Haryana and Punjab before 2000 B.C.” States Sedimentary Geologist Suvrat Kher.

Linking the Ghaggar with the Rig Vedic Sarasvati is an insanity because the geography and the people they inhabited with does not match at all with the indigenous Aryan theory. There has surfaced no evidence that can link Ghaggar civilization with the Vedic. There is no semblance in the residential patterns of the Vedics and Indus people. They didn’t know even the bricks and granaries. They didn’t know the great baths and brick-paved streets.

The Rig Veda nowhere mentions famous Kurukshetra through which the Saraswati is supposed to have flowed. Had the Ghaggar been the lost Saraswati and the Bharata clan of Sudasa ruled on the banks of most revered river Saraswati and in whose reign, the most sacred scriptures had been composed, one would expect his mention in Mahabharata. But it is not the case.

We are aware of the tribes frequently mentioned in the Rig Veda with which the Vedics had constant relations as friends or foes. Rig Veda mentions Turvasa, Pakhta, Bhalanasa, Parshu, Bhrigu etc are the tribes those were settled from northwest bordering regions of the Indian subcontinent to Phrygia. The geography of Avesta too suggests it was close to the Vedic geography. The same wars find the place in both the scriptures, i.e. Avesta and Rig Veda. Both the religions possess so much so close affinity that without geographical closeness it is impossible to happen

Had they been in India while they composed Vedas, there would be ample mention of Ganges and Yamuna rivers because they were the rivers those flowed in close vicinity with the vast channels. The Yamuna had stopped flowing into the Ghaggar channel millenniums before the Indus civilization. As rivers, Yamuna and Ganga, with few others find mention only once in Nadistuty Hymn, the creation of the later period, and nowhere else, we can clearly see that the Vedic Aryans came across these rivers in late era. Vedic Sarasvati, that flowed through the Afghanistan was lost to them by that time except for the wonderful memories of the bygone days.

Apart from the river Sarasvati, mostly mentioned river is Rasa which is equated with Avestan Ranha, now identified with the River Tigris. After Rasa there comes Sarayu which is alternatively called Haroyu or Hari-rud. The rivers Gomati (Gomal), Kubha (Kabul), Krumu (Kurram), Suvastu (Swat), Arjikiya (Haro) etc. are the rivers those flow from Afghanistan and its western regions. Many other river names mentioned belongs to the western tributaries to the Indus. Lack of mention of the eastern rivers just suggests that the Vedic people never knew those regions. Had the composers of the Rig Veda were inhabitants of Ghaggar basin, there wouldn’t be frequent mention of such a far away rivers. Rather we would found the mentions of Ganga, Yamuna and other eastern rivers and its tributaries. But this is not the case!

Let us not forget that the nearest distance of the river Swat from Ghaggar is not less than 800 kilometers. All other rivers mentioned are beyond that location. Indus is the common synonym to the river in Vedic vocabulary, hence it always cannot be equated with the Indus river! So, Vedic being residents of the Ghaggar basin is a just imaginary hypothesis that doesn’t stand on the grounds of any proof.

So, no matter how Vedicist scholars want to twist the geological history of the Ghaggar River to make their point, no matter how back they want to stretch time of the Rig Veda, they simply cannot prove the composers of the Vedas were residents of the Ghaggar basin. Thus Kalyanraman and his colleagues want to prove unprovable, but alas, none of his statement gets support from either geological findings or Rig Veda! They now should no this is the end of the Vedicism!

-Sanjay Sonawani

To read Mr. Kalyanramans big claims pls read http://ancientindianwisdom.com/wp-content/uploads/2015/10/00.Kalyanaraman-S.-Sarasvati-Vedic-River-and-Hindu-Civilization.pdf

Tuesday, April 18, 2017

वैदिक-हिंदू वाद का?

कालपरत्वे समाज-संस्कृती अभ्यासाचे आकलन नवीन पुराव्यांच्या प्रकाशात बदलत जात असते. म. फुलेंच्या काळात सिंधू संस्कृती सापडलेलीच नव्हती त्यामुळे भारतीयांनी एवढ्या प्राचीन काळी केवढी भौतिक उंची गाठली होती हे समजणे शक्य नव्हते. शिवाय त्या काळात आर्य-आक्रमण सिद्धांत व "प्रगत आर्यांनी" येथील रानटी लोकांना कसे गुलाम बनवले, जातीव्यवस्था लादत शूद्र स्थान दिले याचेच वारे प्रबळ होते. त्यामुळे एतद्देशीय शुद्रातिशूद्र आणि आक्रमक परकीय आर्य अशी वैचारिक मांडणी होणे स्वाभाविक होते. 


लो. टिळकांनी तर आर्यांचे मूळ आर्क्टिक प्रदेशात शोधले व अभ्यासपुर्ण ग्रंथ सिद्ध केला. किंबहुना आर्य हा भारतीय सांस्कृतिक संघर्षाचा एक कळीचा मुद्दा बनला. द्रविडांनी तर स्वतंत्र द्रविडस्थान मागितला व आर्य भाषांविरुद्ध बंड पुकारले. मुलनिवासीवादही यातून जन्माला आला. बाबासाहेबांनी आर्य-अनार्य हा संघर्ष वांशिक नसून धार्मिक होता असे नि:संदिघ्ध सांगुनही त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. आदिवासी विद्वानही आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांना पिटाळले म्हणून ते अरण्यात-गिरीकंदरांत रहायला गेले म्हणून आदिवासी बनले असे सिद्धांत मांडतात.

खरे तर आर्यवादाचे पाप युरोपियनांचे. सेमेटिक वंशाशी सांस्कृतिक-धर्मिक नाळ तोडायची म्हणून त्यांनी आर्य सिद्धांताला जन्म दिला. हा वंशश्रेष्ठतावाद हिटलर-मुसोलिनीने आत्यंतिक टोकाला नेला. यातून युरोपियन विद्वान अर्धवट शहाणे झाले. त्यांनी आर्यवंशऐवजी "आर्यभाषा गट" व ही आद्य भाषा बोलणा-यांचे आद्यस्थान या शोधयात्रेत बदलवले. लेबल बदलले पण छुपा वांशिक श्रेष्ठतावादाचा गंड गेला नाही. त्यांना उत्तर म्हणून एतद्देशिय तलागेरी, कल्याणरमणादि विद्वान आर्य भारतीयच असून त्यांनी युरोपापर्यंत जात आर्यभाषा पसरवल्या हे सिद्धांत मांडायला व वैदिकवाद्यांना वर्चस्ववादी बळ द्यायला सुरुवात केली. या वर्चस्वतावादाच्या संघर्षात आपण इतिहास आणि संस्कृतीचे हनन करत आहोत हे या अतिउत्साह्यांच्या लक्षात आले नाही.

एतद्देशिय व विदेशी विद्वानांच्या मते आर्य कोण तर ते ज्यांनी वेदांची व वैदिक धर्माची निर्मिती केली. त्यांना आपण वैदिक आर्य म्हणूयात. या वैदिक आर्यांनीच सिंधू संस्कृतीची निर्मिती केली असे ठासून सांगितले जायला लागले. थोडक्यात या देशात जेही काही आहे ते सर्व वैदिक आर्यांनीच निर्माण केले असा त्यांचा एकुण मतितार्थ. प्रत्यक्षात ऋग्वेद तर सोडाच पण ब्राह्मण ग्रंथांतही वैदिक लोक नागरी संस्कृतीचा भाग असल्याचे दिसत नाही. त्यांना भाजलेल्या वीटा माहित नाही. सिंधू संस्कृतीतील मुद्रांपासून ते स्नानगृहे, धान्याची कोठारे, अलंकार निर्मितीचे कारखाने, विदेश व्यापार, बंदरे ई. या कशाकशाचा त्यांना सुगावाही असल्याचे दिसत नाही. सिंधू संस्कृतीचे अवर्षनांमुळे झालेल्या -हासाचे व नागरी संस्कृती सोडत ग्रामीण संस्कृती स्विकारायचा प्रवासही कोठेही साधा ध्वनितही होत नाही. ते घग्गर नदीला सरस्वती समजतात. समजोत. पण पर्जन्यमान बदलल्याने बारमाही वाहणारी नदी शेकडो वर्षांच्या काळात (इसपू १७५० ते इसपू १५००) कशी क्रमश: आटत मोसमी बनली याचेही विवरण वेदांत अथवा ब्राह्मण ग्रंथांत नाही. वैदिकांना एवढी प्रिय, अंबीतमे, नदीतमे नदी एवढ्या बदलातून जाते याबाबत काहीएक विधान नाही. छोटीमोठी युद्धे नोंदवणा-या ऋग्वेदात व उत्तरकालीन ग्रंथांतही या प्रचंड बदलाचे पुसटसेही चिन्ह नाही. या बदलाने सिंधू संस्कृतीच्या लोकजीवनाची दिशाच पालटली. जुन्या संस्कृतीची मोडतोड झाली. हा बदल त्याच संस्कृतीच्या निर्मात्यांच्या साहित्यात जराही येत नाही याचे कारण हे लोक मुळात त्या संस्कृतीचे निर्माते सोडा, भागही नव्हते आणि त्या संस्कृतीला ओळखतही नव्हते हे आहे.

सिंधू संस्कृती शिव, मातॄदेवता, वृक्ष व विविध शेतीउपयोगी पशू पुजत होते हे उत्खनित पुराव्यांवरून स्पष्ट आहे. ऋग्वेदात या धर्मकल्पनांचे अस्तित्व नाही. किंबहूना ते लिंगपुजकांचा द्वेष करत. ते मुर्तीपूजा निषिद्ध मानत. त्यांचे इंद्र-वरुणादि देव हे अमूर्त असून यज्ञाच्या माध्यमातून त्यांना हवी देत संतुष्ट करणे हे त्यांचे कर्मकांड. यजुर्वेदात स्पष्ट म्हटले आहे, "ना तस्य प्रतिमा अस्ति". म्हणजे देवाची प्रतिमा असू शकत नाही. थोडक्यात वैदिक धर्म अथवा वैदिक आर्यांचा सिंधू संस्कृतीशी काही संबंध नव्हता. ऋग्वेदाचा भुगोल अभ्यासला असता तो दक्षीण अफगाणिस्तानातील असून अवेस्त्याचा भुगोल आजच्या उत्तर अफगाणिस्तान आहे हे स्पष्ट दिसते. ज्या नद्यांचा वारंवार ऋग्वेदात उल्लेख आहे त्या सर्व अफगाणिस्तानातील आहे. गंगा-यमुनेचा उल्लेख फक्त एकदाच येतो. तोही उत्तरकालीन ऋग्वेदात...त्यांना माहित असलेल्या नद्यांची नांवे त्यांनी त्यात नोंदली आहेत. त्यांनी नोंदलेल्या टोळ्या, म्हणजे पर्शू (पर्शियन) तुर्वसू (तुराणी), गांधार (गांधार), पख्त (पख्तून), पार्थव (पार्थियन) इत्यादि) या सर्व प्राचीन पर्शियातील आहेत. इतकेच नव्हे तर खुद्द जरथुश्ट्र ऋग्वेदात उल्लेखला आहे आणि गाथांतही वैदिक लोकांची नांवे आहेत. याचे कारण एकच व ते म्हणजे हे लोक निकट राहत होते, त्यांच्यात धार्मिक व म्हनून राजकीय संघर्ष होता. या संघर्षाचे प्रतिबिंब पुरेपूरपणे दोन्ही धर्मांच्या धर्मग्रंथात पडले आहे.

म्हणजेच वैदिक धर्म हा मुलभारतीय नाही.

तसेच त्यांचे आक्रमण झाले याचाही पुरावा नाही. विदेघ माथवाच्या कथेनुसार काही लोक भारतात आले व त्यांनी येथे धर्मप्रसार केला हे स्पष्ट होते. धर्मप्रसार ही पुरातन काळापासून आजतागायतपर्यंत नवी बाब नाही. बौद्ध धर्मही प्रचारित होत पार ब्यक्ट्रियापर्यंत गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेतच.

पण समस्या निर्माण झाली ती आर्यवादामुळे, वर्चस्वतावादामुळे. येथील वैदिक हे बव्हंशी धर्मांतरित आहेत. काही तर बनावट वैदिक आहेत कारण का तर प्रतिष्ठा वाढते. वैदिक वर्णव्यवस्थेने निर्माण केलेले ते समाजमानसशास्त्रीय संकट आहे. वेद, यज्ञ याला एवढी प्रतिष्ठा मिळाली ती त्यातील गुढानेच नव्हे तर डामडौलाने. मुळात यज्ञ हे साधे होते. पण धर्मप्रसारासाठी यज्ञ हे पार बारा बारा वर्ष चालवणारे बनवले गेले. नवीन गोष्टींचे आकर्षण सर्वांनाच असते. अनेक लोक वैदिक बनले ते यामुळे, त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णात जाण्याचा अट्टाहास अधिक होता. पण पुढे अनेक कारणांनी यज्ञ थांबले. गौतम बुद्धाने खरे तर वैदिक धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे बौद्ध परं
रागत तंत्रप्रधान शैवधर्माचेच अनुकरण करू लागल्याने वैदिकांनाही परंपरागत हिंदू लोक-दैवतांना शरण जाण्याखेरीज पर्याय राहिला नाही. प्रश्न आर्थिक...जगण्याचा असतो. यज्ञ परवडणारे वा करून घेऊ इच्छिणारे राजे-धनिकच यज्ञांना "रामराम" ठोकू लागल्यावर पोटार्थी सांग्रसंगित यज्ञ करणा-या वैदिकांचे काय होणार? 

असे असले तरी यज्ञ महिमान गाजवत राहणे त्यांनी सोडले नाही. आजही यज्ञ होतात. गवगवा केला जातो. वैदिकांशी संबंध नसलेले हिंदू चार वीटा रचून अग्नी पेटवला व संस्कृत मंत्र म्हटले तरी त्यालाच यज्ञ समजतात. पण त्यात म्हटले जाणारे मंत्र खरोखर यज्ञाशी संबंधित असतात का हे तपासण्याची पंचाईत करत नाहीत. 

धर्मांतरितच असल्याने त्यांनी सोडलेल्या दैवतांची पूजा-अर्चा स्विकारणे मानसिक व धर्मदृष्ट्या त्यांना किती जड गेले असेल याची आपण कल्पना करू शकतो.

मग त्यांनी जी शक्कल लढवली त्याला तोड नाही. शिवाला रुद्राभिषेक सुरु केला. तेही पुरे पडेना म्हणून ऋग्वेदातील विष्णू समोर आणत पराक्रमी अवैदिक पण लोकप्रिय राजांना विष्णुचे अवतार ठरवले. हिंदू (शैव) देवता पुजतांना पुरुषसूक्त (ज्याचा कोणत्याही दैवताशी काही संबंध नाही)  म्हणायला सुरुवात केली. हा धार्मिक व्यभिचार नव्हता असे कोण म्हणेन?

बरे, हरकत नाही. पोट भरण्यासाठी अशी नाटके करावी लागतात असे समजू. पण येथे ही समस्या झाली कि पोट जाळतांना स्वत:चा वांझ श्रेष्ठतत्वतावादही जपला गेला. तो जपण्यासाठी पुरेपुर काळजीही घेतली गेली. म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथांना जाणुन घेण्याचा मार्गच बंद केला. वेदाज्ञा-वेदप्रामाण्य नांवाखाली जे वेदातही उल्ल्लेखलेही नाही त्याचा धाक निर्माण केला.

हे लोक परके नव्हते. येथीलच होते. स्वार्थासाठी ते सांगत गेले आणि येथलेच...आपलेच म्हणून लोकही विश्वास ठेवत गेले. तसेही भारतीय लोक "ईश्वरी संविधान" येते तेंव्हा गप्पच बसतात, निमुटपणे स्विकारतात. येथल्याच लोकांना ती मानसिकता माहित कशी नसेल?

आणि आजही वैदिक आर्यांचा (येथील किंवा बाहेरील) नंगानाच अशुद्ध विद्वत्तेच्या नांवाखाली चालुच आहे. ज्या देवता वैदिक नाहीत त्या देवतांच्या पुजा-अर्चनाबाबत हे लोक नियम बनवत धार्मिक हुकूमशाही निर्माण करत आहेत. त्यांनी त्यांचे यज्ञ त्यांना हव्या त्या पद्धतीने करावेत. मुर्तीपुजाच मुळात अवैदिक असल्याने आणि ब्राह्मण हे वैदिक धर्माज्ञेप्रमाणे फक्त यज्ञ करण्यास (पूजा नव्हे) पात्र असल्याने त्यांनी अवैदिक देवतांचे पुजारपण करून स्वत:चा धर्म बुडवू नये. करायचेच असले तर ते पुजारपण अवैदिक पद्धतीनेच करा. तुमचे वैदिक नियम घुसडायचे काम नाही. तुमचा धर्म बुडवता ते ठीक आहे...आमचा बुडवू नका.


-संजय सोनवणी

They are not for Hindus!

We the Hindus are not revivalists. RSS' constant Vedicist propaganda and lies about "Vedics knew all" has defamed Hindus across the world because of the subterfuge claims and that too by misusing the name "Hindu". RSS do not propagate Hinduism. It is a Vedicist organization by core and principles. Veil of the Hindu identity is taken just to promote the Vedic ideology.   

We, the Hindus, believe that India was advanced in many branches of the science even before the Vedic entry in India, continued to enjoy fruits of the technological advances till recently, but we do not think it is a reason to boast. We have due reverence towards our forefathers who has sailed us up to here through the good and bad times. Every civilization of the past was advanced in some or other technologies. Egyptians had the technology to build massive Pyramids, which remains unparallel with others. We respect all the civilizations on the equal footings for their ingenious advancements.

RSS and the allied scholars think otherwise. Golvalkar says in his key book ‘We or Our Nationhood Defined” that Hindusthan (India) was a land of plenty with advanced science, cultivation, industries, and a culture “which made every individual a noble specimen of humanity, truth and generosity, under the divine influence of which, not one of the hundreds of millions of the people, ever told a lie or stole or indulged in any moral aberration” (p 46). 

Of course, this is a lie. To revive Vedicism telling false glories of the past is a dirty business of the RSS people. The cultural heritage RSS scholars speak about is always connected with the Vedics. This is why the stories are kept on floating about the Vedic science, Vedic mathematics, Vedic surgery and all. By misinterpreting archaeological and scriptural data, they want to prove that the Indus civilization was authored by Vedic Aryans! So when they say "Hindutva" it essentially means "Vedicism", not else. 

So in words, they call themselves "Hindu" and yet they want to credit everything to Vedic origin. This is nothing but a cultural fraud. They are trying to claim almost everything which remotely cannot be associated with the Vedic tradition. They keep on boasting the non-existent achievements of the Vedics. There never existed Vedic age in India! There is no proof to indicate that right from 1500 BC till 600 BC ever existed Vedic age! Not even a single excavated or numismatic evidence points out at such hypothetical age in India. 

It was Swami Dayananda Saraswati, who, seeking to reform Hindu religion and Hindu society first propounded the idea of a Vedic Golden Age and asked Hindus to ‘return to the Vedas’ This concept was later persuaded by Savarkar and Golwalkar gave it finishing touches. In short, to the so-called Hindu revivalists, Vedic age was the Golden age! Hindus nowhere were counted because to them they were subjugated savages by the mighty Aryans! Now, they promote indigenous Aryan theory, however, the supremacist view is not abandoned. 

“Vastu Shastra has its beginnings in Rig Veda and is scientific in its tenor. Today, the whole world is looking at green living, thanks to the way we are suffering due to erratic concretisation. The concept of Vastu revolves around the healthy relationship of nature and infrastructure, hence its modern relevance,” Joy Sen, IIT Kharagpur faculty member of the institute was quoted by Times of India.(17th April 2017) on the backdrop of the announcement of the introduction of Vastushastra classes in Architecture! 

Can't you see the pattern? The most superstitial things, those too not remotely related with the Vedas in any way, are being introduced in the curriculum. This is Vedic insanity! It is sheer ignorance marred with the Vedic supremacist thought. How can we the Hindus accept it?

This way, on fraud, they want to establish the nationalism that dreams of imposing the fourfold social order of the Vedics on the Hindus. The ulterior dream is so dangerous, not only for the other minor religions but majority Hindu population. Vedic is a different religion. It has nothing in common with Hinduism. Both traditions are distinct in every respect. The division was always in place and recognized.  Their calling themselves "Hindu" in itself is an example of their deceitful nature. 

Hindu's should understand the Vedic schemes. They are not for Hindus but Vedics. They want to revive Vedicism. With all due respect to the Vedic religion, better is Hindus stay away from the Vedicists!

-Sanjay Sonawani


Monday, April 17, 2017

भारतकथा वैदिक आगमनापुर्वीची!

मुळात मूळ भारतकथा घडली तेंव्हा वैदिक भारतात प्रवेशलेही असण्याचे शक्यता नाही. कारण महाभारताच्या बीजकथेत जी सामाजिक स्थिती आहे तशी स्थिती वैदिकांत असल्याचे कसलेही सूचन नाही.

उदा.: १. पाच भावांनी एका स्त्रीशी लग्न करणे या प्रर्थेचा दुरान्वयानेही वैदिक साहित्यात निर्देश नाही.

२. वैदिकांत वर्णसंकर हा गहन चिंतेचा विषय होता. वर्णसंकर होऊ नये म्हणून प्रचंड बंधने घालण्यात आली. पण भारतकथेतील बव्हंशी  मुख्य पात्रे ही तथाकथित वर्णसंकरीत आहेत. वर्णसंकरितांना वैदिक समाजनियमांनुसार राज्य करताच येत नाही. मुळात केवळ त्याच आधारावर ते वैदिकही ठरू शकत नाहीत.

३. भिमाने हिडिंबेशी केलेला एक वर्षीय करार विवाह हा वैदिक विवाहप्रकारांत कोठेही बसत नाही.

४. वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषी ऋग्वेदरचनेत सामाविष्ट होते. ही रचना मुळात अफगाणिस्तानात झाली. त्यामुळे कुरु-पांचाल प्रदेशात घडणा-या कथेत ते कसे असू शकतात? प्रदिर्घ आयुष्याच्या भाकडकथा दुर ठेवल्या तर ही घालघुसड लक्षात येते.

५.  वैदिक साहित्यातील राज्यव्यवस्था, ग्रामव्यवस्था कोठेही महाभारतातील चित्रणाशी यत्किंचितही जुळत नाही. वैदिक भारतात आल्यावर महाभारत घडले असते तर धार्मिक साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले असते, पण तसे वास्तव नाही.

६. महाभारतातील नगरे हे सिंधूकालीन नगररचनांशी साधर्म्य दर्शवतात. शिवाय ती असुरांनी निर्माण केली ता मुळ सत्याचे अवशेष नंतरच्या भाकडकथा घुसवणा-यांना पुसता आलेली नाहीत. वैदिक साहित्य हे नगररचनाशास्त्राशी दुरान्वयानेही संबंध दर्शवत नाही. किंबहुना त्यांचे अज्ञानच त्यातून प्रतीत होते.

७. "पुरू" या नांवाची वैदिकांची एक टोळी होती. पुरु नांव अवेस्त्यातही विपूल प्रमाणात आढळते. ऋग्वेदातील पुरु हे टोळीनाम आहे, व्यक्तीनाम नाही. इसवीसनपुर्वी तिस-या शतकातही गांधारी प्राकृत जीवंत होती याचे लिखित पुरावे अस्तित्वात आहेत. तिच्याच निकटची दारी (अवेस्त्याची पर्शियन भाषेची एक बोली) भाषा त्याच वेळीस अस्तित्वात होती. हे भाषिक जाळे आजही जीवंत आहे. त्यामुळे समान शब्द आले म्हणून वैदिकांना कशाचेही श्रेय देणे गैर आहे. संस्कृत भाषा मुळात दुस-या शतकापर्यंत अस्तित्वात आलीच नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागते. पुरु हा शब्द प्राचीन काळी वेगवेगळ्या अर्थाने विविध संस्कृत्यांत वापरला जात होता हे  स्पष्टपणे दिसते. नामसाधर्म्यावरून अथवा त्यातून अनुकूल अर्थ काढत झरथुस्ट्राचा जन्म हस्तिनापूरला झाला, गया येथे त्याला ज्ञान प्राप्त झाले असा अर्थ काढणारे आजही कमी नाहीत! तसाच उद्योग महाभारताबाबत केला तर मग अ.ज. करंदीकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाभारतकथा मुळात पश्चिम आशियात घडली हेही मान्य करावे लागेल. पण ते वास्तव नाही.

"पुरु" हा शब्द ऋग्वेदात टोळीचे नांव म्हणून येतो. अवेस्त्यात हाच शब्द "पौरु...पुरु" असा येतो व त्याचा अर्थ पुरातन असा आहे तसाच मनुष्यनिदर्शकही आहे. याच शब्दाची अनेक रुपे असून नागरिक, नगर असेही शब्द पुरू हा मुळ घेऊन बनवण्यात आलेले आहेत. उदा. पूर, पौर इ.  "पुरु" हा शब्द असिरियन इष्टिका लेखातही येतो व तेथे या शब्दाचा अर्थ "जननिर्णय" असा आहे. अक्काडियन ही सेमेटिक गटाची भाषा आहे, इंडो-युरोपियन नव्हे. त्यामुळे महाभारतातील पुरु हा ऋग्वेदातीलच पुरू असे मानायचे काही कारण नाही. भारतीय पुरु ऋग्वैदिक पुरु टोळीशी संबंधित असल्याचे अंदाज चुकीचे आहेत. ( संदर्भासाठी पहा- "The Construction of the Assyrian Empire: A Historical Study of the Inscriptions of Shalmanesar III (859-824 B.C.) Relating to His Campaigns to the West by Shigeo Yamada, Pub.  Brill, page- 323-24)


८. विवाहप्रकारांत पाहिले तर असूर विवाह हा प्रकार आहे व तो नेमका क्षत्रियांस लागू आहे असे स्मृती सांगतात. कृष्णाने केलेला  विवाह त्याच प्रकारचा होता. पण कृष्ण कथेनुसारच मुळात क्षत्रिय नाही. तो स्वत: असूर कुळातला आहे, त्याची आईही असूर कुळातील आहे. असूर वैदिक असू शकत नाहीत. म्हणजेच तथाकथित क्षत्रियही असू शकत नाहित. किंबहुना असते व वैदिक धर्म तेंव्हा भारतात असता तर यावर मोठा धार्मिक गहजब माजवला गेला असता. व साहित्यात तिचे पडसाद उमटले असते. पण तसे चित्र नाही. उलट उत्तरकालीन प्रचारकांनी केलेली ती सारवासारव आहे.

येथे मी अत्यंत अल्प उदाहरणे दिली आहेत. महाभारतातील समाज व्यवस्था वैदिक समाजव्यवस्थेशी दुरान्वयानेही जुळत नाही. प्राचीन असुरांच्याच कथांना एनकेन प्रकारेन वैदिक प्रचारासाठी वापरण्यासाठी त्यावर वैदिक कलमे करण्यात आली आहेत.  आणि ती स्पष्टपणे पाहता येतात. फक्त त्यासाठी वैदिक चष्मा बाजुला सारला पाहिजे! भारतकथा वैदिक धर्म भारतात येण्याच्या बराच काळ आधी घडून गेली आहे. महाभारतातील वैदिक कलमे बाजुला केली की वास्तव दिसू लागते. 

Sunday, April 16, 2017

Myth of the Vedic Age!


I wonder when I see all the time the Vedicist scholars of the modern day, even IIT'ans relate advanced mathematics and other sciences to the Vedic times. I wonder what Vedic times they speak about? Is there any historical proof that shows the particular era was the Vedic times? 

To call Vedic times it should be assumed that the Vedicism was spread almost in all parts of the country. We must then admit that the scholars of every branch were Vedics. There should be no hesitation in admitting to the facts if they are proven, at the least to some extent. 

But what facts tell us?

a. Vedas originated in ancient Iran around about 1500 BC.

b. Entry of the Vedic religion in this country was around about 1000 BC.

c. Mature Indus Civilisation's attested period is 2600 BC.

d. The Vedics sought the first refuge in the valley of Indus and then moved towards Kuru-Panchal and Videha region. Later they established in Magadha where they had to face tremendous resistance from Lokayats, Jainism and Buddhism. (6th Century BC) It took another four to six hundred years for the Vedics to come out of the setback and spread throughout the country by way of the conversions. It was a slow process. Hence till second century AD, Vedic religion remained in obscurity. 

e. Vedas and early Vedic literature in itself don't contain any science or scientific view. Their mathematical knowledge was rudimentary and limited to the construction of the fire altars.

f. We do not find the trace of any Vedic element, even the language, on the numismatic or inscriptions across the country beginning from sixth Century BS till First century AD. 

g. It is proven beyond doubt that the creation of the major three darshans, Upanishads and Agamic literature can not be linked with the Vedic tradition and some of them are anterior to Vedas.

iron artifacts

h. Long before Vedic entry in India, in 2000 BC, Indians already had invented the iron and were making implements from them including scientific devices like one that to draw the circle. (Refer to the excavations in Gangetic region)  Vedas did not know iron till they came in India. Indus civilization is known for it architectural advancements and manufacture of specialty goods and metal works. Without the scientific background, this is not possible. This does mean that the Indians were far advanced long before the Vedics entered Indian subcontinent. 

i. If at all there was any Vedic era that was during Gupta reign when the Vedic religion got royal patronage and a chance to spread their religion by polluting the history. But we still do not find any advancement in the science that can be termed as "Vedic". The tradition of the science of metallurgy, architecture, shipbuilding, textile etc. finds it advanced stage right from 2600 BC till later era which has nothing to do with the Vedic tradition. 

j. Few Vedic mathematicians indeed did emerge, like Aryabhata, Varahmihira etc. who substantially contributed to the mathematics but the ground already was prepared by the Hindus i.e. the people following traditional non-Vedic religion.  

k. None of the reputed and revered Vedic god ever reached to the high esteem in India. This clearly indicates that the Vedic age is a carefully nourished myth. 

Hence, the objection is referring to the Vedic age when it was nonexistent prior to second century AD. Later also, though the Vedics gradually became socially dominant because of the converts and royal patronages, still 85% of the Hindu populace kept on following their own religion and ritualistic practices. Vedics could not extinguish the Hindu religion though they hated it. Till this date, Hindus are adhering to their own religion though they have psychologically accepted the Vedic supremacy! The constant propaganda about the sanctity of the Vedas and fire sacrifices helped them penetrate the psyche of the general masses. However, there is no reason to believe ever there was era Vedic era and that the all scientific advancements belong to them! 

India had achieved monumental advancement millenniums before the Vedic religion was founded! They came to India as refugees, not as the conqueror. The foreign dynasties like Kushans even do not acknowledge their existence! You may refer to the Rabtak inscription of Kanishka to know this very fact. Is there any physical proof that can substantiate their claim of the Vedic Age? 

But they have a web of speakers. They have a bunch of the intellectual goons that so faithfully distort the history and proofs to misguide and misinform the Hindus so that the illusion of the Vedic supremacy remains unshaken even in the modern era.  

The tragedy is Hindus do not much take interest in the cultural and religious history for their strife for survival and fighting with the odds. They are the majority and yet intellectually influenced by the alien religion because of the constant Vedic propaganda and apathy towards the schemes those Vedics have been designing all the time to ensure their reign over them. 

There was nothing as called as Vedic science. To term any science as Vedic you need to prove that the unbroken tradition of all the branches of old science were introduced, commanded and practiced by them for the benefit of the intellectual paupers! There is not a single instance to prove that! Still, they brag on every platform about "Vedic achievements" and "Glory of the Vedic forefathers!". Yes, there were some extraordinary intellectuals among them also, but they were not originators of any. Most of the later Vedic philosophy is a reaction to the Hindu philosophy! 

The history evidences how they hijacked even the local deities like Vitthala and Tirupati. Attempts to hijack Shiva and Shakti are ancient and yet we find their antagonism towards both the major deities of the Hindu religion. Examples are many. They hijacked deities, philosophy and the cultural ethos of the Hindus making them inferior before them when they were not! This is time to stop all these practices and abandon the psychological burden that is created by the Vedics for their selfish motives.

-Sanjay Sonawani

Saturday, April 15, 2017

Upanishads are anti-Vedic!


Image result for upanishadsThe scholars all the time were aware that the Upanishads could not be linked with the Vedas. Upanishads always represented the ancient religion that was originated from Tantras (or Agamas) and mostly were based on the Sankhya Darshana. The early Upanishads emerged to protest Vedicism on philosophical grounds in the regions of North India, especially Videha kingdom, where Vedic religion had found some space to begin with. The people, enchanted by the Vedicism and its elaborate fire sacrifices, had started converting to that religion. To stop the people from moving into the Vedic camp the scholars through the Upanishads started attacking the fallacy of that religion which had no sound philosophical structure or logical ritualistic base.  

The distinction was always clear as the Upanishads were always called “Vedanta”, end of the Vedas or end of the Vedic doctrine. But the impression was created later that the Vedanta meant “ending portions of the Vedas”. They changed the meaning so deceitfully that the people over the time forgot that Upanishads were part of their own ancient tradition that strongly had opposed the Vedic religion.

“If it be granted that the true derivation of the word ' Upanishad ' is what is suggested by Prof. Max Muller, then it would be one piece of evidence to show that the common belief of the Hindus is wrong and that the subject matter of the Vedas and the Upanishads are not complimentary but antagonistic. That the system of thought embodied in the Upanishads is repugnant to that of the Vedas is beyond doubt” so rightly had observed Dr. Babasaheb Ambedkar in his ‘Riddles in Hinduism”.

Upanishads too are not free from the interpolations, misinterpretations and fabricated history. Vedics had been masters of such malpractices and continue to be so in modern times as well. Many Vedic scripts were written in later course following the style of the original Upanishads to obscure the original doctrine of the ancient Upanishads. However the attempts failed as they never could reach the philosophical heights of the original tradition. The philosophy of the anti-Vedic Upanishads is so much so clear that a layman also can easily identify its true essence. The Upanishads succeeded in restricting the spread of Vedicism in the ancient times. Vedics had to move to Magadh region to find new patrons. The way Buddha and his philosophy too was attempted to hijack, the Upanishads were not exception. Vedic religion could spread its charm in India it was because of their sheer malpractices. The Vedas were declared infallible and originated directly from the God. Vedas were given divine status and were propagated everywhere applying all the possible means. These were of course mesmerizing practices those helped them to establish supremacy of the Vedas and hence the Vedics though very few could understand the meaning of the Vedic verses. 

Almost every scholar, even non-Vedic too, of the past started declaring his work had Vedic sanction, no matter even if his writing was against the tenets of the Vedas. There are many texts those claim being based on the Vedic teachings when we cannot trace anything of that sort in the Vedas. This practice emerged only because the writers too sought respect in the royal courts where Vedics had already established their supremacy! 

Hindu religion, though in practice from pre-Vedic era, having its own philosophy and rituals, gradually got shadowed by the Vedic dominance that was attained by the immoral means.  Though the common Hindu people followed their ancient religion which was nowhere remotely connected with the Vedas, they too nourished the threat of the Vedas. 

There was small percentage of the people who read, recited the Vedas and followed the Vedic doctrine in their day to day life. The Vedic rites were all the time were reserved for them. They had closed their doors soon after Gupta era to disallow any entry in their religion by conversion which prior to that was a normal practice in the Vedic religion. In social practice Vedic religion always remained independent and self governed. What they did was more disastrous, they stole the cultural ethos of the Agamic (Hindu) people. 

By deliberate misinterpretation of the term “Vedanta” they took hold of the Upanishads and other ancient philosophy too.The explanations given by the modern Vedic scholars, including Tarkateertha Laxmanshastri Joshi, about the anti-Vedic elements in most of the Vedanta literature were lame and face savers. They said it was reactionary movement of  the Kshatriya's to overthrow the yoke of the Brahmanical supremacy. They tried to portray that it was the internal struggle of the Vedics. But Upanishads do not support this claim. Sankhya Darshan too refutes this claim. 

We can see it clearly that the term “Kshatriya” originates from original ‘Khatiya, land owner which has completely different connotation and has nothing to do with the Sanskritized term Kshatriya. Also, Kshatriya never was second ranking class in Vedic social order but Rajanya.  The same applies to the word “Brahma” which has two different meanings in two different cultures. One, in Vedic context, Brahma means verse and second, in Upanishadic context, “Brahma” means omnipotent principle. Upanishads Brahma is very close in meaning with the Yaksha and is found being used alternatively to represent the same supreme element. The most revered 'Om' too originates from the Upanishads, nowhere to be found in the Vedic literature, because Upanishads do not belong at all with the Vedas. The linguistic similarities were later on misrepresented to show the Vedic origin of everything!  However, knowingly they never tried to explain the drastic change in the meaning in parallel scenarios. 

As Dr. Ambedkar states, Vedas and Upanishads are antagonistic to each other in the subject having nothing in common. Upanishads belong to the ancient Tantra (Agamic) tradition of the Hindus. Upanishads were meant to create first systematic philosophical resistance in the spread of the Vedic religion and succeeded too to some extent. Gradually, with mischievous efforts, Vedics took charge of that philosophical tradition and portrayed it being Vedic when it was not! 

Adim Hindu Parishad is determined to remove Vedic elements from the Hindu religion while reclaiming its obscured  heritage to purify Hindu religion!

Wednesday, April 12, 2017

सवर्ण-उच्चवर्णीय?

उच्चवर्णीय, सवर्ण यासारखे शब्द वापरणे म्हणजे वैदिक असल्याचे अथवा वैदिकवाद मान्य असल्याचे लक्षण होय. हिंदुंमध्ये कधीही वर्णव्यवस्था नव्हती. वैदिक धर्म येथे आल्यावर हिंदुंच्या तत्कालीन आगमशास्त्रांनीही वर्णव्यवस्थेचा समूळ विरोध केला आहे. कोणी उच्च व कोणी खालचे ही सामाजिक मांडणी विघातक असून या शब्दांवर पुर्ण बहिष्कार घातला पाहिजे.

एकोणिसाव्या शतकातेल विद्वानांनी वैदिक समाजव्यवस्था म्हणजेच भारतीय समाजव्यवस्था असे चुकीचे गृहितक धरुन आपापल्या सामाजिक तत्वज्ञानाची मांडणी केली. हिंदू व वैदिक या स्पष्ट दोन समाजधारा आहेत हे त्यांना माहित नव्हते असे नाही. आर्य-अनार्य, अभिजन-बहुजन, वेदोक्त-पुराणोक्त वगैरे धार्मिक भेद त्यांच्या समोर होतेच. दोन धर्मांच्या दोन व्यवस्था आहेत हे त्यांने लक्षात घ्यायला हवे होते. 

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद यातुन निर्माण केला गेला खरा पण स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानणारे अथवा असलेले अनेक समाजघटक वैदिक किंवा वैदिकवादी असुन त्यांचे वर्तनही वैदिक वर्चस्ववादाला साजेशे असले तरी ते "ब्राह्मणेतर" म्हणवत या चळवळीच्या मुळावर आले हा इतिहास आहे. हिंदुंचे खरे नुकसान ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे झाले व वैदिक वर्चस्ववाद मात्र सामाजिक जीवनातून तसुभरही हलला नाही. 

माध्यमांनी सवर्ण-उच्चवर्णीय वगैरे शब्द सातत्याने वापरत वैदिकवादालाच खतपाणी घातले. सर्व सामाजिक चळवळी या शब्दाशी येऊन धडकल्या. यातुन आपण आपल्याला वैदिक समाजव्यवस्थाच मान्य असल्याचे दाखवत जातो आहोत याचे भान आले नाही.

जाती म्हणजे पारंपारिक व्यवसाय. सर्वांचेच सामाजिक व सांस्कृतिक योगदान बरोबरीचे असल्याने कोणी जन्माने उच्च अथवा नीच असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यवसायांमधे आर्थिक चढौतार येतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपले आहेत. त्या अर्थाने जातीही संपत चालल्या आहेत. जातीव्यवस्थेच्या उद्गमाबाबत गोंधळ घातला गेल्याने व तिची नाळ कारण नसतांना मनुस्मृतीशी घातली गेल्याने द्वेष वाढला असला तरी जातीव्यवस्थेचे काल्पनिक गारुड संपले मात्र नाही.  सर्व जाती समान असुन सर्वांनाच त्यांच्या व्यवसायाएवढाच पुरातन इतिहास आहे हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिलेले आहे. हा इतिहास निश्चितच गौरवशाली असल्याने कोणीही अकारण अथवा वैदिकवादी म्हणतात म्हणून हीण मानणे हे अनैतिहासिक व अधार्मिक आहे ही आदिम हिंदू परिषदेची अधिकृत भुमिका आहे. 

वैदिक धर्म भारतात आला. सुरुवातीला या धर्माला विशेष कोणे राजाश्रय दिला नाही. गुप्त राजवटीने या धर्माला मूक्त राजाश्रय दिला व वैदिक तत्वज्ञान समाजात झपाट्याने पसरू लागले. तत्कालीन आगमिक पंडितांनी या वैदिक वर्णव्यवस्थेचा खंदा विरोध केला. दहाव्या शतकापर्यंत हिंदू आगमिकांनी वैदिकांचा वारू रोखून धरला. वैदिक पुन्हा मुलतत्ववादी बनले व निबंधकाळात स्मृत्यांची नव्याने रचना करत, विविध राजांचा आसरा मिळवत आपली धर्मतत्वे समाजाच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला हा इतिहास आहे. हिंदु आपली मुळची समतेची परंपरा विसरत गेले व उच्च-नीचतेचे भ्रम जोपासू लागले. याला मुळ कारण भारताची झालेली आर्थिक अवनती होती. जगण्याचा संघर्ष बिकट झाला होता. संतही या वर्ण-जाणीवांनी प्रभावित झालेले होते. दहाव्या शतकापुर्वी असले चित्र आपल्याला दिसून येत नाही.

त्यामुळे आता तरी वैदिक मुलतत्वांना हिंदू धर्मातून हटवत हिंदुंचा मुळचा समतेचा मार्ग चालावा लागेल!

-संजय सोनवणी

"बहुजन संस्कृतीचा विकास" कोठे गेला?

तर्कतिर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी "वैदिक संस्कृतीचा विकास" हा ग्रंथ लिहिला तसाच "बहुजन संस्कृतीचा विकास" असा ग्रंथ लिहिला होता. असा संदर्भ रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकात वाचला. वाईला असताना त्या ग्रंथाच्या हस्तलिखिताचा प्रचंड शोध घेण्याचा प्रयत्न केला. विश्वकोश कार्यालय, प्राद्न्य पाठशाळा, शास्त्रीजींची लायब्ररी सगळीकडे बघितले. त्यांच्या मुलाला विचारले. त्यांना काहीच माहीत नव्हतं. शेवटी वसंत पळशीकरांना विचारलं. ते गालातल्या गालात हसले. त्यांना बोलताना त्रास होत होता तरी बराच वेळ बोलले. ते शास्त्रीजींच्या आतल्या वर्तुळातले होते. त्यांनी जो अंदाज मांडला तो कटू वाटला तरी बरोबरच होता. पळशीकरांचं म्हणनं होतं - तो ग्रंथ लक्ष्मणशास्रीजींनीच नष्ट केला असेल. कारण राजकियद्रुष्या त्यांना तो ग्रंथ प्रकाशात आणनं अडचणीचं ठरलं असतं.

म्हणजे "बहुजन संस्कृतीचा विकास" असा ग्रंथ शास्त्रीजींनी लिहिला होता, त्याविषयी पळशीकरांना माहीत होतं. शिवाय त्या ग्रंथाचं महत्व आणि ताकद पळशीकरांना कळलेली होती किंबहुना त्यांनी तो वाचलाही असावा.

कारण काहीही असलं तरी तो ग्रंथ अजून प्रकाशात आलाच नाही.
अजूनही मला वाटतं त्या ग्रंथाचं हस्तलिखित कुठेतरी पडून असेल. आणि प्रकाशात यायची वाट पाहत असेल.
या घटनेतून स्पष्ट होतं बहुजनांचा स्वतःचा असा इतिहास आहे आणि वैदिक इतिहास संपवू शकेल इतका स्फोटक आहे. थोडक्यात आपला इतिहास आपणच शोधून काढला पाहिजे.

-Nitin Wagh

Monday, April 10, 2017

हिंदू संस्कृतीची राजरोस चोरी...


सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक धर्मीय आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. या मंडळीने सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. (The Deciphered Indus Script-1999) त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असाही हास्यास्पद दावा केला. 

याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्यचे त्यांना सिद्ध करायचे होते! तसा एकही पुरावा उत्खननात मिळालेला नव्हता. आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर संपुर्ण घोड्यांभोवतीच फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृती वैदिकांचीच निर्मिती हे सिद्ध करायचे तर कोठुन तरी त्यात घोडा घुसवणे आवश्यकच होते! त्याशिवाय ते सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

मग त्यांना बनावटगिरी करणे भाग पडले. त्यांनी फोर्जरी केली व लिपी वाचल्याचे दावे केले. पण त्यांचे नशीब काही एवढे चांगले नव्हते!

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक  प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने (?) सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आणली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी प्राण्याच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत त्यांनी बैलाचा चक्क घोडा केला आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली. टीकेचा भडिमार झाला. 

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकंना एवढ्याचसाठी भासते कि हिंदुंना कसलाच इतिहास नव्हता हे त्यांना वारंवार सिद्ध करायचे असते. आधुनिक काळात एवढी बनावटगिरी, चक्क फोर्जरी केली जाते तर जुन्या काळात यांनी इतिहासात काय काय घोळ घालून ठेवले असतील याचा तुम्हीच विचार करा. हिंदुंचे सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?

हिंदुंनी आपल्या संचिताबाबत, संस्कृतीबाबत निरंतर सावध राहणे त्यामुळेच गरजेचे बनून जाते! सारे काही वैदिकांचे हा भ्रम निर्माण करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत आले आहेत. आता वैदिकांचे वैदिकांना आणि हिंदुंचे हिंदुंनाच ठेवण्याची वेळ आली आहे. त्याखेरीज हिंदुंचा आत्माभिमान जागा होणार नाही. दुस-यांच्या ओंजळीने पाणी पिणे सोडून द्या! सांस्कृतिक चोरांना त्यांची जागा दाखवा!


(विट्झेल-फार्मर यांचा लेख या लिंकवर उपलब्ध आहे.

http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm )

-संजय सोनवणीहिंदुंचा एल्गार!

बहुजनीय म्हणवणा-या चळवळीतील विचारवंतांचे अपयश हे होते कि त्यांनीही सर्व परंपरा ब्राह्मणी मानल्या आणि नाकारल्या. त्यांनी ब्राह्मण शब्द घेतला पण त्यांचेच सगे वैदिक क्षत्रीय आणि वैश्य सोडून दिले. या तीन वर्णांचा वैदिक धर्म होतो हे त्यांनी लक्षात घेतले नाही. जर ब्राह्मण वाईट असतील तर स्वत:ला क्षत्रीय-वैश्य समजणारे कमी वाईट नव्हते. 

वैदिक परंपरेपक्षा सबळ परंपरा पार सिंधूपुर्व काळापासून हिंदुंना लाभली आहे आणि हे दोन वेगळे धर्म आहेत हेही त्यांनी लक्षात घेतले नाही. परंपरा-संस्कृती नाकारल्याने असे चित्र निर्माण झाले कि जणू काही या कथित बहुजनांना संस्कृतीच नव्हती आणि त्यांचा इतिहास गुलामीचा आहे. धर्मच नीट समजावून न घेतल्याने हिंदु धर्माला आणि ब्राह्मणांना शिव्या द्यायची नवी शिवी-संस्कृती मात्र निर्माण केली. त्यामुळे ही चळवळ अपयशी ठरली जे होणारच होते!

देव-धर्मापार जाणे हे एक समस्त मानवजातीचे ध्येय जरी असले तरी जे बाहेर पडताहेत त्यांना आपण  नेमके कशाच्या पार जातो आहे हे तरी माहित पाहिजे. इतिहास-संस्कृती व परंपरा यांचे ठळक भान नसेल तर सामाजिक प्राणी असलेला मनुष्य हा संभ्रमितच राहतो आणी अशी माणसे जीवनात फारशी यशस्वी होत नाहीत. सामान्य माणसासाठी तर धर्म हा एक मानसिक आधार असतो. तो आधार हिरावून घेता येत नाही. पण त्याला त्याचा धर्म नीट माहित असलाच पाहिजे. वैदिक धर्मामुळे दहाव्या शतकानंतर हिंदुंवर न्युनगंडाचे गहन सावट पडले. इतके कि संतही त्या सावटातून सुटले नाहीत. याचा परिणाम त्यांचे तत्वज्ञानही इहवादी न बनता प्राय: परलोकवादी होण्यात झाला. सामाजिक व सांस्कृतिक फेरमांडणी करत वैदिक कचाट्यातून सुटण्याचे प्रयत्न झाले नाहीत. वैदिकांत संत अपवादानेच झाले पण वैदिक धर्म-मार्तंडांनी समाजाची मानसिकता आपल्याच कचाट्यात ठेवण्यात अभूतपुर्व यश मिळवले. आजही स्थिती फारशी बदललेली नाही. हे सारे वैदिक हे हिंदू धर्माच्या आवरणाखाली वावरत असल्याने घडले.

एप्रील २००६ मध्ये किस्त्रीममधील एका प्रदिर्घ लेखात आणि "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकातून मी सर्वप्रथम वैदिक आणि हिंदू हे वेगळे धर्म असल्याचे दाखवून दिले. या पुस्तकाच्या नंतर तीन आवृत्त्या झाल्या. यात माहितीची भर पडत राहिल्याने आता नवेच पुस्तक लिहित आहे. "असूरवेद" कादंबरीनेही जनसामान्यांपर्यंत हा धार्मिक भेद नेण्यात हातभार लावला. त्यावर नाटक येवुन राज्य नाट्य स्पर्धेतही पहिले पारितोषिक मिळाले. सुनील हरिश्चंद्रांसारख्या नाट्यसंहिता-लेखक व दिग्दर्शकाचा त्यात मोलाचा वाटा होता. इंग्रजीतही "Origins of the Vedic Religion & Indus-Ghaggar Civilisation" दोन वर्षांपुर्वीच प्रसिद्ध झाले. मायकेल विट्झेल, वेंडी डोनिजर, एडविन ब्रायंटसारख्या इंडोलोजीतील जागतिक किर्तीच्या विद्वानांनीही त्याची दखल घेतली. आताच संजय क्षीरसागरांनीही मनुस्मृती ही केवळ वैदिक धर्मियांपुरती कशी मर्यादित होती, हिंदुंसाठी ती मुळात लिहिलीच गेली नव्हती हे मनुस्मृतीतीलच पुराव्यांधारे सिद्ध करणारे मोलाचे पुस्तक लिहिले आहे. भविष्यात शेकडो संस्कृती-अभ्यासक विद्वान लिहित राहतील व सर्वसामान्य हिंदुंचे डोळे उघडत, त्यांच्यातील न्युनगंडाची भावना समूळ नष्ट करत अभिमानाने उभे करण्यात मदत करतील यावर माझा विश्वास आहे. हिंदुंची प्रगती त्यातच सामावली आहे. 

हा आत्मभान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. वैदिक धर्मियांचा द्वेष करण्याचे काहीएक कारण नाही. जे कट्टर वैदिक आहेत ते आजही हिंदुंना टाचेखाली ठेवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. आपला वैचारिक संघर्ष त्यांच्याशी आहे. आम्ही कोणाचे वर्चस्व सहन करणार नाही आणि कोणावरही वर्चस्व गाजवनार नाही हाच आदिम हिंदू परिषदेचा मुलमंत्र आहे. जी जी आमच्या धर्मात वैदिक तत्वे घुसली आहेत ती  मात्र हटवली जात राहील हे मात्र नक्की. त्यांनी त्यांचा धर्म अवश्य पाळावा पण आमच्या धर्मात कोणाची लुडबुड नको. आम्ही वकीलपत्र दिले नसतांना हिंदुंच्या नांवे "फतवे" काढण्याचा या वैदिकवाद्यांना काय अधिकार? आम्ही तो अधिकार नाकारतो. दावणीचे बैल होण्याचे नाकारतो. 

जे जे सज्जन आहेत, मानवतावादी आहेत...मग ते कोणत्याही धर्मातील असोत, आम्हाला वंदनीयच आहेत. जे जे मानवताविरोधी आहे त्याचा धि:कार आम्ही, आमच्या धर्मातील असला तरी, करत राहू!

हिंदुंचे सळसळते, चैतन्याने भरलेले सर्जक जग पुन्हा निर्माण करु!
-संजय सोनवणी