Sunday, April 2, 2017

उदासीन हिंदू

सांस्कृतिक इतिहासाच्या बाबतीत हिंदू उदासीन राहिल्याने त्यांच्या देवतांचे त्यांच्या डोळ्यादेखत अपहरण झाले व त्यावर वैदिक पुटे चढवली गेली. त्यांच्या देवतांचा त्यांचेच शोषण करण्यासाठी वापर केला गेला. देवतांचाच वापर करत विषमता वाढवायला हातभार लावण्यात आला. तंत्रांमधील स्त्री-पुरुष समता, सामाजिक समता या बाबींचा विसर पाडला गेला तो तंत्रांनाच बदनाम करत गेल्यामुळे. वामाचार म्हणजेच तंत्र असा समज करुन देण्यात आला. प्रत्यक्षात योग, भक्ती, जप, तप, द्वैता-द्वैत या सा-या तांत्रिक संकल्पना. या संकल्पनांना वेदांत स्थानच नाही. तंत्र म्हणजे कृषीकेंद्रित सुफलनात्मक विधी-विधान. वेदांचा जन्मही झाला नव्हत तेंव्हापासुण तंत्रात्मक पधती भारतात विकसित झाल्या. तंत्रे ही प्राय: इहवादी असून धर्मिक कर्मकांडाचे अवडंबर त्यांच्यात नाही. पण वैदिकांमुळे केवळ शोषणासाठीच कर्मकांडांचा हिंदुंमधे सुळसुळाट झाला. त्यांना कसलाही धार्मिक आधार नाही. हिंदुंनी डोळस बुद्धीने आधी आपला नेमका धर्म कोणता हे समजावून घ्यायला पाहिजे. त्यातील वैदिक तत्वांना हटवायला हवे. तरच हिंदूचे ऐहिक व मानसिक कल्याण होईल.

No comments: