Sunday, April 2, 2017

अवतार संकल्पना

अवतार संकल्पना ही एक बनावट वैदिक चाल आहे. ऋग्वेदात आधी अवतार घ्यायचे काम प्रजापतीकडे होते. पहिले तीन अवतार खरे तर त्याचेच. पण गुप्त काळात अवतारांचे काम विष्णुकडे का आणि कसे आले? पुढे त्यांने शिवाच्याही अवतारांची कल्पना आणली खरी पण हिंदुंनी ती मात्र पुर्ण हाणून पाडली. वैदिकाळलेल्या हिंदुंनी मात्र विष्णुचे अवतार मान्य केले आणि फसले. राम-कृष्णाच्या काळात मुळात वैदिक धर्मच भारतात जर आला नव्हता तर अफगाणिस्तानातील वैदिकांचा दुय्यम देव विष्णू इकडे अवतार घ्यायला, असुरांना मारायला येईलच कसा हा विचार आमच्या आधुनिक विद्वानांनाही सुचला नाही. प्रल्हादही विष्णुचा कसा भक्त होईल हेही या मुर्खांना सुचले नाही. शिवाची अवतार संकल्पना जशी हिंदुंनी धुडकावून लावली तशीच राम-कृष्णावतारांचीही संकल्पना धुडकावून लावली पाहिजे. त्यांना मानव समजतच त्यांचे गुण-अवगुण यांची निर्मळपणे चिकित्सा केली पाहिजे. अर्थात वैदिकांनी घुसवलेल्या चमत्कार कथा वगळून!

-Sanjay Sonawani

No comments: