Sunday, April 2, 2017

जे जे संस्कृतात...ते ?

जे जे संस्कृतात आहे ते वैदिकांनीच लिहिले या भ्रमात राहणे चुकीचे आहे. संस्कृत भाषा बुद्धिस्ट, जैन, तांत्रिक आणि वैदिकांनी विकसीत केली ती अर्थप्रवाह सुस्पष्ट आणि सर्वत्र एकच रहावा यासाठी. संस्कृतच्या विकासाची विविध रुपे आपल्या नाणी आणि शिलालेखांतील प्राकृत मजकुर सनपुर्व तिनशे ते सन दोनशे पाचशे या वर्षांच्या कालावधीत कसकसा संस्कृतमद्ध्ये विकसित होत गेला ते दर्शवतो. ही देववाणी नाही तर उत्तरकालात बनवलेली कृत्रीम भाषा आहे. दुस-या शतकानंतरच य भाषेत शिलालेख व अन्य साहित्य प्रकट व्हायला लागते. तेही बव्हंशी भर घातलेले अथवा एडिट केलेले अनुवाद आहेत. त्यात प्रामाणिकपणा किती हे सहज पाहता येते. शूद्रक, कालीदास वगैरे अनेक कवी व नाटककार हे वैदिक नव्हते. संस्कृतचा व्याकरणकार पाणिनीही वैदिक मुळाचा नव्हता. त्यामुळे संस्कृतात होते म्हणजे काहीतरी विलक्षण अजब व वैदिकांचे हा भ्रम सर्वप्रथम सोडला पाहिजे.

No comments: