Friday, April 7, 2017

हिंदुपण समजावून घ्या!

हिंदू धर्मावर जेही हल्ले झालेले आहेत ते केवळ वैदिक तत्वज्ञानामुळे समाजात पसरलेल्या विषमतेच्या व अन्य काही गैर गोष्टींबाबत. जात म्हणजे व्यवसाय हे मुळचे हिंदुंचे समीकरण जाऊन त्याला कर्मविपाक आणि जन्माधिष्ठित जात-स्वरुप आले. वैदिकांच्या चातुर्वर्ण्याने उच्चनीचता हिंदुंत घुसली. वैदिकांच्या दृष्टीने शूद्र केवळ त्यांचे जे सेवक-दास होते तेवढेच होते. पण हिंदुंनी ते संबोधन स्वत:ला चिकटवून घेतले. बलाढ्य व्यावसायिक जाती आपल्याला हीण समजू लागल्या. ते इतिहास विसरले कि चंद्रगुप्त मौर्यापासून यादवांपर्यंत भारतात साम्राज्य गाजवनारेही वैदिकांच्या दृष्टीने शुद्रच होते. वैदिकांची स्मृती त्यांना जरा तरी लागू असती तर तर एवढे सम्राट-राजे कसे झाले असते? वैदिकांच्या शुद्रांना तो मुळात अधिकार तरी आहे काय? हिंदुंनाही ते परधर्मी समजत होते आणि हे लागले स्वत:ला स्मृत्यांतील शूद्र समजायला! तुम्ही जरा तरी वैदिक असता तर वैदिक कर्मकांड आणि वेदोक्त तुम्हाला का नाकारले गेले असते? असा कोणता धर्म जगात आहे जो स्वधर्मियांना आपल्या धर्माचे कर्मकांड करू देत नाही? आपण ज्या धर्माचेच नाही त्याचे धार्मिक अधिकार कसे असतील हा प्रश्न मध्ययुगानंतर हिंदुंना पडला नाही. आधी हिंदुंना आपण वैदिक नाही याचे पक्के भान होते. पण हा प्रश्न हिंदुंना मध्ययुगानंतर पडला नाही कारण आपल्या आर्थिक अवनतीच्या काळात कर्मविपाकाचे गारुड डोसक्यात बसले. वैदिकच त्यांना आपले धार्मिक तारणहार वाटू लागले. आपले पारंपारिक गुरव त्यांना नकोसे झाले. जे तुमच्या धर्माचेच नव्हते ते कसे तुमचे तारण करणार? वैदिकांचे सुधारक (गांधीजींमुळे काही अपवाद वगळता) वैदिक समाजाचेच प्रबोधन करत राहिले हा इतिहास काय सांगतो? बाबासाहेबांनी धर्मांतर घोषित केले पण त्यांना थांबवायला हे आले नाहीत कारण हिंदुंनी धर्म बदलला तरी त्यांना काय फरक पडत होता? अलीकडे एका धर्मांतराला विरोध करायला मीच एकटा झगडत राहिलो. हे कोठे गेले होते? त्यांना हिंदू फक्त वापरायला हवे आहेत. त्यांचे हित करणे हे त्यांच्या धर्मात बसत नाहीत. शूद्र म्हणजे त्यांच्या दृष्टीने काफिरासारखे. मग कोणाकडे तुम्ही आशेने पहाता आणि त्यांना हिंदू समजता? हिंदुंचे कल्याण त्यांचे हिंदुपण समजावून घेण्यात आहे!

-Sanjay Sonawani

No comments: