Sunday, April 2, 2017

पंथोपपंथ

हिंदू धर्मात हजारो पंथोपपंथ आहेत. प्रत्येक पंथाचे आपापले तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानातील अथवा कर्मकांडांतील वैदिक तत्वे सर्वस्वी हटवावीत व आपापले पंथ शुद्ध स्वरुपात लोकांत न्यावीत अशी आदिम हिंदू परिषदेची भुमिका आहे. परंतू आदिम हिंदू परिषद कोणत्याही पंथाची प्रचारक नाही. हिंदुंअतर्गतच्या सर्व पंथांनी धार्मिक समता, न्याय आणि मानवतेच्या उच्च भावनेनेच आपापल्या पंथतत्वांकडे व म्हणुनच समाजाकडे पहावे ही अपेक्षा आहे. या तत्वांखेरीजचा कोणताही पंथ परिपुर्ण होऊ शकत नाही एवढेच सर्वांनी लक्षात घेतले म्हणजे पुरेसे आहे.

-Sanjay Sonawani

No comments: