Sunday, April 2, 2017

परतंत्र समाज

समाज अनेक कारणांनी राजकीय दृष्ट्याच परतंत्र होतो असे नाही तर धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्याही परतंत्र होतो. धर्माची सुत्रे परधर्मियांच्या हाती गेलेली पहावी लागतात. अशा वेळीस सुज्ञता यातच असते कि स्वत्व शोधावे तसे आपल्याच धर्माचे मुळ व सारतत्व शोधत त्याचा अंगिकार करत परधर्मीय जोखडे झुगारून द्यावीत. हा वैचारिक संघर्ष असतो आणि तो विचारांनीच लढावा लागतो. हिंदुंवर अनेक वैदिक पुटे व तीही गुलामीची व दुय्यमत्वाची बसवली गेली आहेत, ती हटवणे आमचे सर्वप्रथम कर्तव्य आहे. त्याखेरीज समाजात समतेचे, बंधुतेचे, परस्पर आदर समानतेच्या पायावर करण्याचे औदार्य येणार नाही. कोणावरही वर्चस्व गाजवायचे नाही आणि कोणाचेही वर्चस्व स्विकारायचे नाही हे इतके साधे तत्व आहे.

-Sanjay Sonawani

No comments: