Wednesday, April 12, 2017

"बहुजन संस्कृतीचा विकास" कोठे गेला?

तर्कतिर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी "वैदिक संस्कृतीचा विकास" हा ग्रंथ लिहिला तसाच "बहुजन संस्कृतीचा विकास" असा ग्रंथ लिहिला होता. असा संदर्भ रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकात वाचला. वाईला असताना त्या ग्रंथाच्या हस्तलिखिताचा प्रचंड शोध घेण्याचा प्रयत्न केला. विश्वकोश कार्यालय, प्राद्न्य पाठशाळा, शास्त्रीजींची लायब्ररी सगळीकडे बघितले. त्यांच्या मुलाला विचारले. त्यांना काहीच माहीत नव्हतं. शेवटी वसंत पळशीकरांना विचारलं. ते गालातल्या गालात हसले. त्यांना बोलताना त्रास होत होता तरी बराच वेळ बोलले. ते शास्त्रीजींच्या आतल्या वर्तुळातले होते. त्यांनी जो अंदाज मांडला तो कटू वाटला तरी बरोबरच होता. पळशीकरांचं म्हणनं होतं - तो ग्रंथ लक्ष्मणशास्रीजींनीच नष्ट केला असेल. कारण राजकियद्रुष्या त्यांना तो ग्रंथ प्रकाशात आणनं अडचणीचं ठरलं असतं.

म्हणजे "बहुजन संस्कृतीचा विकास" असा ग्रंथ शास्त्रीजींनी लिहिला होता, त्याविषयी पळशीकरांना माहीत होतं. शिवाय त्या ग्रंथाचं महत्व आणि ताकद पळशीकरांना कळलेली होती किंबहुना त्यांनी तो वाचलाही असावा.

कारण काहीही असलं तरी तो ग्रंथ अजून प्रकाशात आलाच नाही.
अजूनही मला वाटतं त्या ग्रंथाचं हस्तलिखित कुठेतरी पडून असेल. आणि प्रकाशात यायची वाट पाहत असेल.
या घटनेतून स्पष्ट होतं बहुजनांचा स्वतःचा असा इतिहास आहे आणि वैदिक इतिहास संपवू शकेल इतका स्फोटक आहे. थोडक्यात आपला इतिहास आपणच शोधून काढला पाहिजे.

-Nitin Wagh

No comments: