Wednesday, July 26, 2017

नागपंचमी


Image result for serpent worship india


नागपंचमीचा संबंध पुरातन कृषी संस्कृतीशी आहे व आदिम काळापासून आदिम हिंदू हे शिव-शक्तीचे पूजक राहिले असल्याने तोही अपरिहार्य संबंध या सणाशी आहे. वारुळ ही योनी व नाग हे लिंग अशी कल्पना आदिम काळात माणसाने केली असल्यास नवल नाही. शिवाय नाग हा जसा शेतक-यांना उपकारक होता तसाच त्याचा दंश जीवही घेऊ शकत असल्याने त्याचे पूजा करुन ते अरिष्ट टाळण्याची तांत्रिक भावनाही त्यामागे होती. नाग हा संरक्षकही आहे अशी लोकभावना आहे. नाग हे देवक मानणारे अनेक मानवी समुदाय भारतात पुरातन काळापासून रहात आले आहेत. इतकेच काय जगभरातील प्राचीन संस्कृत्यांत नागपूजा होती याचे पुरावे नागप्रतिमांमधून मिळाले आहेत. भारतातील असंख्य गावांच्या नांवात नाग येतो. नाग पंचमीचे स्वामित्व स्त्रीयांकडे आहे. सुफलनता विधींत स्त्री महत्ता नेहमीच होती. स्त्री-पुरुष समानतेतील तो एक दुवा होता. वैदिक धर्मात मात्र नागांना अस्तित्व नाही. किंबहुना ते दुष्ट व शत्रू मानले गेले आहेत. उदाहणार्थ वृत्र हा अहि (म्हणजे नाग) आहे व तो वैदिकांचा शत्रू असल्याचा अनेक कथा ऋग्वेदात आल्या आहेत. हिंदुंनी मात्र नागमहात्म्य जपुन पुरातन काळापासुनच्या सामाजिक/धार्मिक प्रथा आजतागायत जपल्या आहेत. नंतर स्थापन झालेल्या जैन व बौद्ध धर्मातही नागाचे स्थान अत्यंत महत्वाचे राहिले आहे. 

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!